नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी -- कावठे शिवारामध्ये ९० हजारांची घरफोडी धुळे ः कावठे (ता. साक्री) शिवारातील शेतात असलेल्या घरातून चोरट्याने कोठीचे कुलूप तोडून ७० हजार रुपये किंमतीची चांदी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरट्याला गजाआड केले. कावठे शिवारात सुभाष बोरसे यांचे शेत असून, तेथे कालशा पराडके (वय ५३) वास्तव्यास आहेत. यात २९ ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास चोरट्याने घरातील कोठीचे कुलूप तोडून आत ठेवलेली ७० हजार रुपये किंमतीची ७० भार चांदी आणि २० हजारांची रोकड, असा ९० हजारांचा मुद्देमाल नेला. याबाबत कालशा पराडके यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करत असताना साक्री पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कुंदन ऊर्फ भुर्या हिरामण राठोड (वय २६, रा. वंजार तांडा, ता. साक्री) या संशयितास १ सप्टेंबरला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक वळवी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Price : साखरेनंतर आता कांद्याच्या दरात मोठी उसळी, दोन दिवसात ६०० रुपयांनी कांदा दरात वाढ

Pune SIT crackdown: पुण्यात बेकायदा सावकारी व आर्थिक गैरव्यवहार उघड: एसआयटी चौकशीनंतर ४ स्वतंत्र गुन्हे, कोट्यवधींची फसवणूक

Marathi News Live Updates : टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न

Nagpur Detonator Case: जिवंत डेटोनेटरसह चोरीचे मोबाईल घेऊन नागपुरात आलेला वेकोलि मजूर आजमशहा चौकात अटक; एटीएस व पेसोची चौकशी सुरू

Law CET Admission: पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी गुरुवारपासून पसंतीक्रम नोंदणी अनिवार्य

SCROLL FOR NEXT