नाशिक

पेपरफुटी प्रकरणी मयुर ठाकरे ताब्यात

CD
NSK26H28589 : मयूर ठाकरे --- पेपरफुटी प्रकरणी मयूर ठाकरे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारातील मयूर ठाकरे यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १) रात्री नाशिक येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत नंदुरबारातील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, परिवर्धा शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील, तक्रारदार तथा ‘एमपीएससी’चा परीक्षार्थी गौरव पाटील, ऋतुजा पाटील आणि नंदुरबारातील मूळ रहिवासी तथा ‘एमपीएससी’चे सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाल मराठे या पाच जणांना अटक केली. आता मयूर ठाकरे यांना पथकाने ताब्यात घेतल्याने संशयितांची संख्या सहा झाली आहे. मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक नंदुरबारात दाखल झाले होते. त्या वेळी पथकाने ऋतुजा पाटील हिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पथकाने नाशिकमधून मयूर ठाकरे यांना ताब्यात घेतले. मयूर ठाकरे नंदुरबार शहरातील एका नामांकित संस्थेत क्रीडाशिक्षक आहेत. ठाकरे अटकेत असलेले अमृत पाटील यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. ठाकरे यांची क्रीडा क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून ओळख असून, त्यांना राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार आणि जिल्हा युवा पुरस्काराचे ते मानकरी आहेत. पेपरफुटी प्रकरणात मयूर ठाकरे यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने मुंबई गुन्हे शाखेचे पथक कसून चौकशी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT