नाशिक

सातशे विद्यार्थ्यांनी घेतली लोककलेची अनुभूती

CD
टुडे ४ ॲंकर NSK26H28587 जळगाव : शानबाग विद्यालयात बालरंगभूमी परिषदेत प्रशिक्षणात कला सादर करताना कलावंत. ........ सातशे विद्यार्थ्यांनी घेतली लोककलेची अनुभूती बालरंगभूमी परिषदेचे प्रशिक्षण; पोवाडा, भारुड, गोंधळ अन् ‘करपावली’चे सादरीकरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि लोप पावत चाललेल्या कलाप्रकारांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या वतीने शानबाग निवासी विद्यालयात पारंपरिक लोककला प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिरात ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाहीर विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना शाहिरी परंपरा, पोवाडा व भारुडाची माहिती देत प्रभावी सादरीकरण केले. भारुडातून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. तसेच पारंपरिक गण, गोंधळ आणि शिवकालीन ‘करपावली’ या लोककलांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लोककलावंत अरुण जोगी, अशोक जोगी व बबन जोगी यांनी ‘करपावली’ सादर करून या दुर्मीळ कलाप्रकाराची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. अवधूत दलाल व गजानन साळुंखे यांनी गोंधळ सादर केला. चौकट विद्यार्थ्यांपर्यंत कला पोहचवली जाणार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के-सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत लोककला पोहोचविण्याचा परिषदेचा संकल्प असून, जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा व भुसावळ येथेही शिबिरे होणार आहेत. विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT