नाशिक

द्वारका चौक १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला : सिंह

CD
द्वारका चौक १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला कुंभमेळा आयुक्त सिंह : साधुग्रामचे संपादन अंतिम टप्प्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : द्वारका चौकातील मुंबई-धुळे मार्गिका वाहतुकीसाठी सुरु करण्यात आली असून १५ ऑक्टोबरपर्यत संपुर्ण चौक वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा आयुुक्त शेखर सिंह यांनी दिली. जानेवारी अखेरीस भुयारी मार्ग नाशिककरांच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तपोवनात साधुग्रामसाठीचे तात्पुरत्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात बुधवारी (ता.२) आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी सिंह बोलत होते. सिंह म्हणाले, की द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असून उड्डाणपुलाखालील एका छोट्या भागातील स्लॅबचे काम सुरु आहे. रस्त्याचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासह कुंभमेळ्यात तीन प्रकारचे दिशादर्शक फलक उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरांतर्गत फलक, पर्यटन स्थळ तसेच तात्पुरत्या फलकांचा समावेश असेल. या फलकांमुळे येणाऱ्या भाविकांना योग्यप्रकारे माहिती उपलब्ध होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सिंहस्थाशी संबंधित ३५० कायमस्वरूपी कामे प्रगतिपथावर असून तात्पुरत्या कामांना पावसाळ्यानंतर प्रारंभ केला जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले. --- सिंहस्थानंतर दुसरा टप्पा द्वारका जंक्शनचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. या दरम्यान, द्वारका जंक्शन येथील पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड १३.५ मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक क्षमतेत वाढ होऊन परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्‍वास आयुक्त सिंह यांनी व्यक्त केला. द्वारका ते दत्तमंदिर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी ९० टक्के जमीन ताब्यात असून पावसाळ्यानंतर या कामास प्रारंभ केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT