फोटो : केशव मते- २८५५४, २८५५५
…
काँग्रेस पक्ष नव्हे, आपले कुटुंब
---
खासदार राहुल गांधींनी साधला जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून, आपले कुटुंब आहे. या कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांशी तेढ ठेवू नये आणि एकोप्याने राहावे, असा मोलाचा सल्ला खासदार राहुल गांधी यांनी राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांना दिला. त्यांच्याशी संवाद साधला व ‘सेल्फी’ही काढला.
नाशिकच्या गंगापूर धरणावरील ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टवर गत १० दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ या प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी (ता. २) झाला. राज्यातील ७२ जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी विशेषत: तरुणांशी त्यांनी संवाद साधला. त्यात प्रामुख्याने कुटुंबीयांकडून आलेल्या प्रश्नांना अगदी उत्तमरीत्या उत्तरे देत त्यांचे समाधान केले. यात प्रामुख्याने काँग्रेची विचारधारा काय आहे आणि त्यानुसार आपण का मार्गक्रमण करावे, यावर भर दिला.
आपल्यात द्वेशाची भावना नसावी, प्रत्येकाने एकजूट होऊन काम केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस विचाराच्या लोकांचे प्रमुख कुठले ध्येय असले पाहिजे, याबाबत मी विचारणा केली. त्यांनी तत्काळ सांगितले, की सगळ्यांनी एकोप्याने राहावे, कोणाच्याही मनात एकमेकांविषयी तेढ नसावा, हा विचार घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केले पाहिजे.
- अभिरी वऱ्हाडे (गोंदिया जिल्हाध्यक्षांची कन्या)
राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांबरोबर राहुल गांधी यांनी फोटो काढण्यासह गप्पा केल्या. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. कौटुंबिक बाबीही त्यांनी अगदी आपुलकीने विचारल्या. त्यांच्याबरोबर बोलल्यावर या नेत्याची उंची किती आहे, ते आपल्या देशाबद्दल अन् देशातील सर्वसामान्य नागरिकांबद्दल नेमका विचार करतात, याची कल्पना आली.
- डॉ. सरिखा नाईक (यवतमाळ जिल्हाध्यक्षांची पत्नी)
…
काँग्रेसची विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. एकांगी विचार स्वीकारणाऱ्या संघटनेत कधीही समाविष्ट होऊ नका. काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहा आणि सर्वांबरोबर काम करण्याचे विचार घेऊन चला, असा सल्ला त्यांनी दिला. एकसंध राहून काम करण्याची विचारधारा मला फार भावली.
- लहू निवंगुणे, जिल्हाध्यक्ष (पुणे ग्रामीण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.