नाशिक

शॉक लागून तरुणाचा मृत्यू

CD
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 28590...चेतन मराठे -- डिजिटल बॅनर लावतानाच शॉक लागून तरुणाचा मृत्यू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः शहरातील स्टेशन रोड भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर डिजिटल बॅनर लावत असताना महावितरण कंपनीच्या तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून जुने धुळ्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. तिघी बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या चेतनच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जुने धुळे भागातील वरखेडी रोडवरील सूर्योदय कॉलनीत राहणारा चेतन गोपाल मराठे (वय २१) हा तरुण कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ती कामे करायचा. दीड वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, तर आई केटरिंगचे काम करते. चेतनला तीन बहिणी असून, त्या सर्व विवाहित आहेत. कुटुंबाचा कर्ताधर्ता असलेला चेतन कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण म्हणून जुने धुळ्यात परिचित होता. गणेश डिजिटलचे काम तो करायचा. स्टेशन रोडवरील नवले क्रॉसिंगजवळ मंगळवारी रात्री गणेश डिजिटलच्या माध्यमातून बॅनर लावण्याचे काम सुरू होते. बॅनर लावत असतानाच जवळच असलेल्या वीज वाहिनीची एक तुटलेली तार चेतनच्या अंगाला स्पर्श करून गेली, ज्यामुळे त्याला तीव्र शॉक बसला. त्याच्यासोबत असलेल्या गौरव बडगुजर या मित्राने त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT