धुळे ः टुडे १ साठी
---
ही बातमी ः नंदुरबार टुडे १ साठीही घ्यावी.
---
पडताळणी गुणांच्या आधारे
अंतिम निवड यादी जाहीर
धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंक भरती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या सरळसेवा नोकरभरती अंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी बँकेमार्फत यंदा ७, ८ आणि ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रक्रियेत उमेदवारांच्या फक्त कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून, कोणतीही मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली आहे.
यापूर्वी पात्र उमेदवारांना ३० व ३१ ऑगस्ट २०२६ ला त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर मुलाखत पत्रे पाठविण्यात आली होती. या पत्रांमध्ये मूळ नियोजित तारखा आणि मौखिक मुलाखतीचा उल्लेख असला तरी आता प्रत्यक्ष मुलाखत होणार नसून केवळ कागदपत्र पडताळणीच पार पडेल. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत मिळालेले गुण आणि कागदपत्र पडताळणीत मिळणारे गुण यांची एकत्रित बेरीज करून, त्या गुणांच्या गुणवत्तेनुसारच उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. याची सर्व संबंधित पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. ई-मेलवर नमूद करण्यात आलेल्या तारखांनुसार (म्हणजेच ७, ८ आणि ९ सप्टेंबर २०२६ ला ज्या- त्या उमेदवाराला कळविलेल्या तारखेनिहाय) पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह धुळे येथील गरुडबाग परिसरातील बँकेच्या मुख्य कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे, असे सीईओ चौधरी यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.