नाशिक

प्रगती शिक्षण संस्था

CD
लेखक फोटो - अंबादास देवरे आधुनिक शिक्षणाची नवी वाट : प्रगती शिक्षण संस्था ------------------------------------------ एका खोलीतून सुरू झालेला प्रवास किंवा पिढ्यान्‌पिढ्या जपलेला विश्वास असो, शिक्षणाचे अंतिम ध्येय मात्र एकच...पाल्याचे जीवन अधिक सक्षम, समृद्ध आणि अर्थपूर्ण घडविणे. बदलत्या काळाबरोबर शिक्षणाची व्याख्याही बदलत आहे. याच बदलत्या गरजेची जाणीव ठेवत सटाण्यातील प्रगती शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक वाटचालीला आधुनिकतेची नवी दिशा दिली आहे. - अंबादास देवरे, सटाणा सटाणा परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभे करता यावे, यासाठी शिक्षणपद्धतीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. आधुनिक सुविधा, प्रयोगाधारित शिक्षण, तंत्रज्ञानाची ओळख आणि त्यासोबतच संस्कार व मूल्यशिक्षण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येतो. आजची मुले उद्याच्या कोणत्या आव्हानांना सामोरी जातील, हे निश्चित सांगता येत नाही. मात्र त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करता येते, या विचारातून विद्यालयाने आधुनिक शिक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. रोबोटिक्स कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान केवळ पाहण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. कोडिंगपासून रोबोटिक्सपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना देणारा ठरत आहे. पुस्तकात शिकलेला सिद्धांत प्रत्यक्ष कृतीत उतरविताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो. सायन्स लॅबच्या माध्यमातून ‘का’ आणि ‘कसे’ या प्रश्नांचा शोध घेण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे. पाठांतरापेक्षा प्रयोग आणि निरीक्षणातून विज्ञान समजून घेण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती विकसित होण्यास मदत होत आहे. डिजिटल युगातील शिक्षणाची गरज ओळखून अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. संगणकाचे ज्ञान हा स्वतंत्र विषय न राहता दैनंदिन अध्ययनाचा भाग बनत असताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी सहजपणे जोडण्याचा प्रयत्न येथे होत आहे. मोबाइलच्या पडद्यापलीकडे विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या जगाशी जोडण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्ग वाचनालयाची संकल्पना राबविण्यात आली आहे. या उपक्रमातून वाचनाची सवय, कल्पनाशक्ती आणि भाषिक समृद्धी वाढविण्याला हातभार लागत आहे. संस्कार आणि संस्कृती : प्रगतीचा आत्मा आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी शिक्षणाचा पाया मूल्यांवरच भक्कम होतो. त्यामुळे प्रगती विद्यामंदिर ही केवळ शैक्षणिक संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे संस्कारकेंद्र ठरावे, यावरही भर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करताना नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. यश मिळविणे महत्त्वाचे आहेच; मात्र त्या यशासोबत संवेदनशील, जबाबदार आणि समाजाभिमुख नागरिक घडणे ही शिक्षणाची खरी कसोटी आहे, हा विचार या वाटचालीच्या केंद्रस्थानी आहे. पालकांशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी ‘प्रगती दर्पण’ ही डायरी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच घर आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक सुसंगत करण्याचा हा प्रयत्न आहे. पालकांचा विश्वास, शिक्षकांची निष्ठा प्रगतीची ही वाटचाल केवळ इमारती, प्रयोगशाळा किंवा आधुनिक साधनांपुरती मर्यादित नाही. त्यामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि पालकांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास ही मोठी ताकद आहे. आपल्या पाल्याच्या भवितव्याची जबाबदारी ज्या विश्वासाने पालक संस्थेवर सोपवितात, त्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी संस्था स्वीकारते. कोट... आम्ही केवळ नवीन इमारती किंवा प्रयोगशाळा उभारत नाहीत, तर सटाण्याच्या मातीत उगवणाऱ्या प्रत्येक स्वप्नाला पंख देण्याचा प्रयत्न करीत आहोत. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे, मात्र आपल्या मूल्यांशी घट्ट जोडलेले नागरिक घडविणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. - अध्यक्ष व संचालक मंडळ, प्रगती शिक्षण संस्था, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT