नाशिक

दिंडोरीतील शेतकऱ्यांचे राहुल गांधी यांना निवेदन

CD
पान-३ मुख्य अंक --------------- NSK26H28613 ओझर ः कॉंग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पॉलिहाऊस अनुदानाबाबत निवेदन देताना दिंडोरी येथील शेतकरी शरद काठे. ------------------- पॉलिहाऊससाठी अनुदान संरक्षण कायम ठेवा ------------- केंद्राकडून कपातीविरोधात शेतकऱ्यांची राहुल गांधींकडे धाव ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ ः पॉलिहाऊस, हरितगृह आणि संरक्षित शेती प्रकल्पांचे अनुदान ५० टक्क्यांवरून ३५ टक्के करण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दिंडोरीचे शेतकरी शरद काठे यांनी ओझर विमानतळावर गांधी यांची भेट घेत सविस्तर निवेदन देत अनुदान कपातीचा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे ५० टक्के अनुदान कायम ठेवण्याची मागणी केली. दरम्यान हा प्रश्न संसदेत उपस्थित करून केंद्र सरकारकडून स्पष्ट भूमिका करण्याची मागणी केली आहे. --------- राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या २१ ऑगस्ट २०२६ च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसाधारण क्षेत्रातील संरक्षित शेती प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य ३५ टक्के करण्यात आले आहे. प्रकल्प अहवाल, बँक कर्ज, पूर्वसंमती आणि प्रत्यक्ष बांधकामाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १३ ते २१ महिने लागतात. त्यामुळे ५० टक्के अनुदान गृहीत धरून प्रक्रिया सुरू केलेल्या शेतकऱ्यांवर आता अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. दोन कोटी रुपयांच्या प्रकल्पात ३० लाखांचा अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो, असे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणले. पूर्वसंमती मिळालेले, कर्ज मंजूर झालेले किंवा बांधकाम सुरू असलेले प्रकल्प जुन्या ५० टक्के दरानेच मंजूर करावेत तसेच ३५ टक्के दर केवळ १ एप्रिल २०२७ नंतरच्या नव्या प्रकल्पांना लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. वाढलेल्या बांधकाम खर्चानुसार खर्चाचे निकष वाढवावेत. हा प्रश्न संसदेत उपस्थित करून केंद्र सरकारकडून स्पष्ट भूमिका मागावी, असेही निवेदनात म्हटले आहे. बाळासाहेब काठे, गणेश तिडके, पंकज विधाते, गणेश विधाते, गणेश काठे, अशोक मौले आदी शेतकरी उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात आपण निवेदन दिल्याची माहिती शरद काठे यांनी दिली. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT