नाशिक

शॉपींग एक्झिबिशन नाशिकमध्ये

CD
फोटो -NSK26H28614 नाशिक : गोल्ब क्लब मैदानावर आयोजित प्रदर्शनात खरेदी करताना ग्राहक. शॉपिंग एग्झिबिशनमध्ये विविध देशातील उत्पादने सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शहरातील ग्राहकांसाठी खरेदीची मोठी पर्वणी ठरणारा मेगा इंटरनॅशनल ट्रेड फेअर शॉपिंग एक्झिबिशन येत्या २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान येथील गोल्फ क्लब मैदानावर (त्र्यंबक रोड, सिव्हिल हॉस्पिटलसमोर ठक्कर बसस्टँड जवळ) आयोजित केले आहे. देशभरातील विविध राज्यांमधील उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात १८ हून अधिक राज्यांमधून आणलेली विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. यात फॅशन, ज्वेलरी, होम आणि किचन अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, पॅकेज्ड फूड, बॅग्स, फुटवेअर, ॲक्सेसरीज यांसह अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. या प्रदर्शनात अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्स, पूर्णपणे वातानुकूलित पार्किंगची सोय तसेच अफगाणिस्तान, कोरिया, दुबई, थायलंड या देशातील उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती गरजेच्या वस्तूंपासून फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित उत्पादनांपर्यंत विविध प्रकारची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. ४,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या पहिल्या ५० ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्यात येणार आहेत. प्रवेश फी प्रति व्यक्ती ३० रुपये असून नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT