नाशिक

सकस आहार, व्यायामातून सुदृढ आरोग्य साधा डॉ. रूपाली बेंडाळे; चौधरी महाविद्यालयात ‘ऋतुमती अभियानास’ प्रारंभ

CD
NSK26H28622 जळगाव : ‘ऋतुमती अभियान’च्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रूपाली बेंडाळे. सोबत प्राचार्य डॉ. पराग नारखेडे व मान्यवर. सकस आहार, व्यायामातून सुदृढ आरोग्य साधा डॉ. रुपाली बेंडाळे : चौधरी महाविद्यालयात ‘ऋतुमती अभियानास’ प्रारंभ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि योग्य झोप या सुदृढ आरोग्याच्या मूलभूत गोष्टी आहेत. युवतींनी आहारात फळे व पालेभाज्यांचा नियमित समावेश करून हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखावी, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रूपाली तुषार बेंडाळे यांनी दिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महिला आरोग्य संवर्धन ‘ऋतुमती अभियानास’ मंगळवारी (ता. २) प्रारंभ झाला. डॉ. रूपाली बेंडाळे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. हे अभियान २ व ३ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येत आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पराग नारखेडे म्हणाले, अभ्यासाचा ताण असला तरी तरुणींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. प्रीती बोंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिल सोनवणे, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. देवयानी पाटील यांच्यासह प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. देवयानी पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. प्रज्ञा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. चौकट आहारात फळे, पालेभाज्या हव्या युवतींच्या आरोग्य संवर्धन विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. बेंडाळे म्हणाल्या, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. त्यामुळे आहारात फळे, पालेभाज्या यांचा समावेश करावा. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Krishna Janmashtami 2026 Do's & Don'ts: गोकुळाष्टमीचा उपवास करताना 'या' गोष्टी टाळाच; श्रीकृष्णांची राहील सदैव कृपा!

अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती, गोव्यात खासगी कंपनीत करतायत काम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना मारहाण केलेल्या आरोपीला उद्या कोर्टात हजार करणार - पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT