नाशिक

हवामान बदलासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

CD
फोटो : NSK26H28632 नंदुरबार : प्रशिक्षणाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांसमवेत आत्माचे दीपक पटेल, डॉ. राजेंद्र दहातोंडे, विघ्नराज बेहरा, किरण अहिरे आदी. ----------------------- पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करावा दीपक पटेल : हवामान बदलासंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये आवश्यक बदल करणे काळाची गरज आहे. बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी केले. सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि मैत्रीत्व चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘हवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर शेतकऱ्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात वाघाळे येथील १५ महिला शेतकरी तसेच अजेपूर येथील १५ पुरुष अल्पभूधारक शेतकरी सहभागी झाले. हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारे परिणाम, आवश्यक उपाययोजना, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जैविक शेतीचे महत्त्व, सेंद्रिय खतांचा वापर, गांडूळखत निर्मिती व वापर, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व, शेताच्या बांधावर व उपलब्ध जागेत विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक विघ्नराज बेहरा, मैत्रीत्व चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक किरण अहिरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उमेश पाटील, जयंत उत्तरवार आणि पद्माकर कुंदे, आरती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. राजेश भावसार, प्रवीण चव्हाण आणि संदीप कुवर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT