नाशिक

भुईमुगाच्या पिकात गांजाची झाडे, शहाद्यात १९ लाखांचा गांजा जप्त

CD
NSK26H28635 नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेली गांजाची झाडे. --- सटीपाणी शिवारातून १९ लाखांची गांजाची झाडे जप्त --- भुईमुगाच्या पिकात गांजाची लागवड सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : स्थानिक गुन्हे शाखेने शहादा तालुक्यातील सटीपाणी गावाच्या शिवारातील भुईमुगाच्या शेतातून १९ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सटीपाणी शिवारात मालनदेवी नाल्याजवळ एकाने भुईमूग पिकाच्या शेतात गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीर लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी यासंदर्भात पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने मलगाव ते सटीपाणी शिवारातील मालनदेवी नाल्याजवळ एका भुईमुगाच्या शेताची पाहणी केली असता, तेथे पिकात ३९ किलो ४ ग्रॅमची १८ लाख १८ हजार रुपयांची गांजाची झाडे आढळली. गांजाची झाडे पथकाने ताब्यात घेतली आहेत. याबाबत संशयित ठाणसिंग हुंड्या ऊर्फ दुंड्या पावरा (रा. जामजिरा जालोद, पो. तऱ्हाड कसबे, ता. शिरपूर, जि. धुळे) याच्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, हवालदार दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे, अंमलदार भरत उगले, शोएब शेख, विशाल मराठे, सतीश घुले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर

माजी भारतीय कर्णधार तारक राऊळ काळाच्या पडद्याआड; कबड्डी जगतावर शोककळा

Marathi News Live Updates: उद्यापासून हैदराबाद गॅझेटप्रमाणे अर्ज करा- जरांगे

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

SCROLL FOR NEXT