नाशिक

बोगस चेक देऊन ७२ हजारांचे इनव्हर्टर-बॅटऱ्या लंपास

CD
बनावट धनादेशाद्वारे इन्व्हर्टर, बॅटऱ्या लंपास व्यापाऱ्याची ७२ हजारांत फसवणूक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : बंद पडलेल्या बँक खात्याचा आणि बनावट स्वाक्षरीचा धनादेश देऊन एका व्यापाऱ्याची ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुसुंबा (ता. जळगाव) येथील दुकानातून ३ इन्व्हर्टर आणि ३ बॅटऱ्या रिक्षामधून मागवून घेत ठगबाजाने व्यापाऱ्याला गंडा घातला आहे. कुसुंबा (ता. जळगाव) येथील ‘श्रीनिवास एजन्सी’चे मालक पवन संजय पाटील (वय २८) यांना १२ जुलैला सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून इन्व्हर्टर व बॅटऱ्यांची मागणी केली. त्यानंतर या संशयिताने रिक्षा पाठवून रिक्षाचालकामार्फत ''बँक ऑफ बडोदा''चा ७२ हजारांचा धनादेश (क्रमांक ००००५९) पाठवला. पवन पाटील यांनी धनादेश स्वीकारून रिक्षात ३ मायक्रोटेक इन्व्हर्टर व ३ एक्साइड बॅटऱ्या पाठविल्या. चौकट स्वाक्षरी कुणाची, धनादेश कुणाचा? त्यानंतर पवन पाटील यांनी हा धनादेश बँकेत जमा केला असता, धनादेशावरील स्वाक्षरी जुळत नसल्याचे आणि संबंधित बँक खाते आधीच बंद असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवन पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फोन करून बॅटऱ्यांची मागणी करणाऱ्या मोबाईलधारक चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक गफ्फार तडवी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Elina Svitolina Interview : युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे पतीसोबत ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न! न्यूयॉर्कमधील अनुभवाबद्दल मारल्या गप्पा

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Janmashtami Kids Dress Up: मुलांना राधा अन् कृष्णाचा लुक द्यायचायं? घरच्या घरी चिमुकल्यांना 'असे' द्या गोंडस रूप!

SCROLL FOR NEXT