नाशिक

तळोद्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त

CD
फोटो : NSK26H28636 नंदुरबार : पथकाने जप्त केलेला गुटखा व वाहन ------------------ चिनोदा येथे तीन लाखांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकावर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला दोन लाख ९४ हजार रूपयांचा पानमसाला व गुटखा चिनोदा गावातून जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटख्याची गुजरात राज्यातून चिनोदा (ता. तळोदा) गावात चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिनोदा गावात छापा टाकून कल्पेश संजय मराठे (रा. चिनोदा, ता. तळोदा) याच्या ताब्यातून दोन लाख ९४ हजार २४८ रुपये किमतीचा पानमसाला व तंबाखू व वाहतूक करण्यासाठी वापरलेला पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण सात लाख ९४ हजार २४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलिस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्‍वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलिस अंमलदार निशीगंध गवळे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT