ॲंकर
शहर टुडे पान दोनसाठी
-----
(एआयचे चित्र वापरावे)
---------
सहा थरांचा मनोरा उभारण्यासाठी गोविंदा पथक सज्ज
----
महिनाभरापासून रोज तीन तास सराव; शिस्त, समन्वयसह सुरक्षिततेवर भर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : दहीहंडी उत्सवाची चाहूल लागल्याने शहरातील गोविंदा पथकांच्या तयारीला वेग आला आहे. गोपाळपुरा गोविंदा पथकाने यंदा सहा थरांचा मनोरा उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून दररोज तीन तास कसून सराव सुरू आहे. शिवाय तरुण कुढापा मंडळासह अंन्य मंडळदेखील जोरदार तयारीला लागले आहेत.
गोपाळपुरा गोविंदा पथकाची स्थापना २०२४मध्ये झाली. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी पथकाने दोन दहीहंड्या फोडून आपल्या कामगिरीची सुरुवात केली. नवीपेठ परिसरातील सहा थरांची दहीहंडी फोडण्याची संधीही पथकाला मिळाली. २०२५मध्येही पथकाने सरावाची परंपरा कायम ठेवत सहा थरांचा मनोरा उभारण्याची तयारी केली.
आमदार भोळेंच्या हस्ते उद् घाटन
यंदा पुन्हा त्याच जोमाने सराव सुरू असून, नवीपेठेसह महापालिका (सतरा मजली इमारत) कार्यालयासमोरील शिवसेनेची दहीहंडी फोडण्यासाठी पथक प्रयत्नशील आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते पथकाच्या दहीहंडी सरावाचे उद् घाटन झाले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत सराव घेतला जात आहे. उंच मनोरा उभारताना सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रत्येक गोविंदाला आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.
कार्यकारिणी जाहीर
या गोविंदा पथकाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी शुभम पाटील व उपाध्यक्षपदी बबलू बारी यांची निवड झाली आहे. प्रशिक्षक म्हणून विशाल पाटील, राणू कोळी व गौरव बारी हे गोविंदांना मार्गदर्शन करीत आहेत. दहीहंडीच्या दिवशी सहा थरांचा मनोरा यशस्वीपणे उभारून दमदार कामगिरी करण्यासाठी पथक सज्ज झाले आहे.
.......
युवतींकडूनही जय्यत तयारी
‘युवतींची दहीहंडी २०२६’ हा उपक्रम पाच सप्टेंबरला शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. त्यासाठीही उत्सव समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकूण १५ संघांमधून ६८५ महिला गोविंदा सहभागी होणार आहेत. सहभागी प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. युवतींच्या दहीहंडीतील विजेत्या संघांना एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. दहीहंडीबरोबरच ढोलवादन, मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, डीजे, लेझर शो व फटाक्यांची आतीषबाजी आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील विविध मंडळे व गोविंदा पथके सज्ज होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.