नाशिक

शौचालयांची दुरुस्ती करा

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- शौचालये दुरुस्त करा अन्यथा आंदोलन --- नगरसेविका प्रतिभा चौधरी; प्रभाग-५ मधील समस्या, महापौर, आयुक्तांना निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील विष्णूनगर, भतवाल टाकीजवळील शौचालय, नदीकिनारी पंचवटी व मास्तरवाडी येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी महापौर, आयुक्तांकडे केली. शहरातील प्रभाग-५ मधील विष्णूनगर, भतवाल टाकीजवळील तसेच नदीकिनारी पंचवटी तसेच मास्तरवाडी येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय, अस्वच्छ व धोकादायक झाली आहे. या शौचालयांचा वापर करणाऱ्या नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या शौचालयांमध्ये अनेक ठिकाणी दरवाजे, भांडे तुटलेले आहेत, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, लाईटची सुविधा नाही. छत व इतर भाग तुटलेले असून काही ठिकाणी छताला गळती आहे. तसेच, सेफ्टी टँकची अवस्थादेखील खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ती अत्यंत गैरसोयीची व असुरक्षित बनली आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत मनपा प्रशासनाकडे यापूर्वीही लेखी, तोंडी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील आरोग्य व बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही नमूद करत प्रभाग पाचमधील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोपही श्रीमती चौधरी यांनी निवेदनातून केला आहे. आंदोलनाचा इशारा सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था अशीच कायम राहिल्यास परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ किरकोळ दुरुस्ती म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. सर्व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व आवश्यक मूलभूत सुविधा येत्या आठ दिवसांच्या आत उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन व वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यासह कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर उपलब्ध मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही श्रीमती चौधरी यांनी दिला आहे. ---

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT