नाशिक

शौचालयांची दुरुस्ती करा

CD
-- शौचालये दुरुस्त करा अन्यथा आंदोलन --- नगरसेविका प्रतिभा चौधरी; प्रभाग-५ मधील समस्या, महापौर, आयुक्तांना निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील विष्णूनगर, भतवाल टाकीजवळील शौचालय, नदीकिनारी पंचवटी व मास्तरवाडी येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी महापौर, आयुक्तांकडे केली. शहरातील प्रभाग-५ मधील विष्णूनगर, भतवाल टाकीजवळील तसेच नदीकिनारी पंचवटी तसेच मास्तरवाडी येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय, अस्वच्छ व धोकादायक झाली आहे. या शौचालयांचा वापर करणाऱ्या नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या शौचालयांमध्ये अनेक ठिकाणी दरवाजे, भांडे तुटलेले आहेत, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, लाईटची सुविधा नाही. छत व इतर भाग तुटलेले असून काही ठिकाणी छताला गळती आहे. तसेच, सेफ्टी टँकची अवस्थादेखील खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ती अत्यंत गैरसोयीची व असुरक्षित बनली आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत मनपा प्रशासनाकडे यापूर्वीही लेखी, तोंडी स्वरूपात वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील आरोग्य व बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही नमूद करत प्रभाग पाचमधील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोपही श्रीमती चौधरी यांनी निवेदनातून केला आहे. आंदोलनाचा इशारा सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था अशीच कायम राहिल्यास परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ किरकोळ दुरुस्ती म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. सर्व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व आवश्यक मूलभूत सुविधा येत्या आठ दिवसांच्या आत उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन व वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यासह कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर उपलब्ध मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही श्रीमती चौधरी यांनी दिला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पोलीस संरक्षणात विद्यानंद बापट निवासस्थानी पोहोचले

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

Yuzvendra Chahal ची जादूई डिलिव्हरी अन् बेन स्टोक्स थेट क्लिन-बोल्ड! फिरकीच्या जाळ्यात कसा अडकला, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT