धुळे टुडे २ साठी...
---
युवक मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी
---
अनिल मुंदडा; बॅनर लावतांना युवकाच्या मृत्यूचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : बॅनर लावतांना विजेचा शॉक लागून चेत गोपाल मराठे या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल मुंदडा यांनी केली आहे.
चेतन मराठे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू होणे ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेमागे कोणाचा निष्काळजीपणा, कर्तव्यातील कसूर किंवा कायद्याचे उल्लंघन झाले आहे का याची निष्पक्ष, सखोल आणि कायदेशीर चौकशी होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज व जाहिरातींबाबत वेळोवेळी प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित केली आहे. त्यामुळे संबंधित न्यायालयीन आदेश, शासनाचे निर्देश आणि लागू असलेले स्थानिक कायदे/ नियम यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाने पार पाडणे आवश्यक आहे. दुर्दैवाने अनेक वेळा एखादी घटना घडल्यानंतर काही दिवस कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे केवळ तात्पुरती कारवाई न राहता कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक यंत्रणा उभी राहणे आवश्यक असल्याचे श्री. मुंदडा यांनी म्हटले आहे.
मागण्या अशा
चेतन मराठे या युवकाच्या मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. बॅनर लावण्याचे आदेश देणारे, काम देणारे, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे आणि इतर संबंधित व्यक्ती/ संस्थांची भूमिका तपासण्यात यावी, संबंधित बॅनर प्रिंटिंग प्रेस/ कंपनीची भूमिका आणि जबाबदारी तपासण्यात यावी, बॅनर अनधिकृत असल्यास त्यासाठी जबाबदार व्यक्ती/ संस्थेविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, प्रशासनाच्या पातळीवर कर्तव्यात कसूर किंवा निष्काळजीपणा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी अनधिकृत बॅनरबाजीविरोधात नियमित तपासणी व प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा राबवावी, एका निष्पाप युवकाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच कायदा आणि सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही श्री. मुंदडा यांनी म्हटले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.