नाशिक

कंपनीत नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने तरूणीची विक्री करणाऱ्यास सश्रम कारावास

CD
नोकरीच्या बहाण्याने युवतीची विक्री; पाच जणांना सश्रम कारावास --- चार आरोपी गुजरातचे, दोन महिलांचा समावेश सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : कंपनीत नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय युवतीची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांनी हा निकाला दिला. यातील चार आरोपी गुजरातमधील असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे. चिंचपाडा (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील १९ वर्षीय युवतीची नंदुरबारात एका नर्सिंग स्कूलमध्ये शिकत असताना, रोहित वळवी याच्याशी ओळख झाली होती. एका कंपनीत नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने रोहित तिला व्यारा (गुजरात) येथे घेऊन गेला. तेथे रोहितने पीडितेला नेहा नामक महिलेकडे सोडले. पीडितेला पाटी येथील भारती नामक महिलेच्या घरी सोडण्यात आले. ११ जून २०२५ ला भारती पीडितेस आहवा येथे घेऊन गेली. तेथे पीडितेस दोन व्यक्तींना दाखविले. याबाबत पीडितेने विचारले असता, ‘मी तुला विकत घेतले असून, जास्त बोलशील तर मारून टाकेल’, अशी धमकी भारतीने दिली. पीडितेचे बनावट आधारकार्ड बनवून किरीटभाईमार्फत पार्थ नामक मुलास दाखविण्यात आले. ‘तुझा पार्थसोबत विवाह होणार असून, ते तुला त्यांच्या गावी घेऊन जातील. गेली नाहीस तर तुला मारून टाकू’, अशी धमकी देत पीडितेचा पार्थसोबत विवाह झाल्याची गुजराथी भाषेत नोटरी करून घेतली. पार्थने पीडितेस त्याच्या घरी गुजरातमधील नडियाद येथे नेले. विवाहकामी किरीटभाईने स्थळ दाखविल्याचे पार्थच्या कुटुंबियांकडून पीडितेला समजले. विवाह लावून देण्याच्या बदल्यात किरीटने पार्थच्या कुटुंबियांकडून ४ लाख घेतले होते. रोहित वळवी, नेहा ऊर्फ स्नेहा वळवी, भारती उर्फ हंसाबेन गामीत, पार्थ भाटिया यांनी मिळून पीडितेला विकून दिले होते. विसरवाडीचे पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी पार्थ अजयकुमार भाटिया (वय २५, रा. अमेरीकन कॉलनी, मोटा महादेव रोड, नडियाद जि. खेडा गुजरात), रोहित महेंद्र वळवी (२२, कोठली, ता. जि. नंदुरबार), नेहा वळवी (२२, साईनाथ कॉलनी, सुरत, गुजरात), भारती गामीत (पाटी, ता. डोलवन जि. तापी, गुजरात), किरीटभाई सुलेमानभाई वणकर (५२, इंदिरानगर अलिंद्रा ता. नडियाद) यांना अटक केली व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांच्यासमक्ष झाली. सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी पार्थ भाटिया, रोहित वळवी, नेहा वळवी, भारती गामीत, किरीटभाई वणकर यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने पाचही आरोपींना न्यायाधीश सय्यद यांनी दोषी ठरवून प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तसेच पीडितेस एक लाख अदा करण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विजय चव्हाण यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक योगिता राठोड, पैरवी अंमलदार राजेंद्र गावित, देवेंद्र पाडवी, दुर्गा वळवी व भावना पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर

माजी भारतीय कर्णधार तारक राऊळ काळाच्या पडद्याआड; कबड्डी जगतावर शोककळा

Marathi News Live Updates: उद्यापासून हैदराबाद गॅझेटप्रमाणे अर्ज करा- जरांगे

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

SCROLL FOR NEXT