नाशिक

आदर्श शिक्षक पुरस्‍कार

CD
जिल्‍ह्यातील १५ जणांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार जाहीर (उपशीर्षक) जि. प. शिक्षण विभागाकडून घोषणा; उद्या वितरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषद शाळांमधील १५ शिक्षकांना जिल्‍हास्‍तरीय आदर्श शिक्षक पुरस्‍काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्‍कार वितरण सोहळा शिक्षक दिनी म्‍हणजे शनिवारी (ता.५) होणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये उत्‍कृष्‍ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पुरस्‍कार देऊन गौरविण्यात येते. यंदाही पुरस्‍कारांसाठी जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यांमधून शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्‍यानुसार शिक्षकांकडून आलेल्‍या अर्जाची छाननी करत शिक्षकांच्‍या मुलाखती घेण्यात आल्‍या. त्‍यानुसार पात्र ठरलेल्‍या शिक्षकांची निवड करत ही यादी नाशिक विभागीय आयुक्‍त यांच्‍याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. यास विभागीय आयुक्‍तांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्‍यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांच्‍याकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. चौकट पुरस्‍कारप्राप्‍त शिक्षक योगेश्‍वर पाटील (जि.प. शाळा आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्‍वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्‍कर (कुरवेल तावसे बु., ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्‍ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर), गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT