नाशिक

रस्त्यावर कचरा, वेस्ट मटेरियल टाकाल तर पाच हजारांचा दंड होणार

CD
(ही बातमी मेन फिचर वापरून, आधीची बातमी क्लब करावी) NSK26H28677 जळगाव : महामार्गावर टाकण्यात आलेले बांधकामाचे राडारोडा (वेस्ट मटेरियल). --- रस्त्यावर कचरा टाकाल तर आता पाच हजारांचा दंड महापौर काळेंचा इशारा; बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवरही होणार कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून नागरिकांचीही आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा (वेस्ट मटेरियल) आणि कचरा टाकणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाई केली जाणार असून, संबंधितांकडून पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली. ‘माझे शहर, माझे अभियान’अंतर्गत शहरातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी आरोग्य विभागाचे समीर बोरोले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, समितीचे पदाधिकारी तसेच अभियानातील स्वच्छता दूत उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. भाजीपाला बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा कचरा वेळेत उचलला जावा, यासाठी सुभाष चौक परिसरात सायंकाळच्या वेळी दोन घंटागाड्या उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. दुकानदारांना सूचना व्यापारी संकुल, दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांनी कचरा थेट रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकू नये. प्रत्येक व्यावसायिकाने दुकानात डस्टबिन ठेवून घंटागाडीमध्येच कचरा द्यावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. चौकट शंभरहून अधिक कचरा स्पॉटचे आव्हान शहरातील अनेक मोकळ्या जागांवर सातत्याने कचरा टाकला जात असल्याने तेथे कायमस्वरूपी कचरा स्पॉट तयार झाले आहेत. अशा शंभरहून अधिक ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न निर्माण झाला असून, डास-मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढत आहे. हे कचरा स्पॉट कायमचे बंद करण्यासाठी उपाययोजना आखण्याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्वच्छता दूत यांच्याशी बैठकीत चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT