नाशिक

जखमी गोविंदावर मोफत उपचाराचा वारसा कायम

CD
आवश्‍यक NSK26H28679 : डाॅ. अवधूत चाेैधरी --- जखमी गोविंदांवर मोफत उपचाराचा वारसा कायम हाडवैद्य चौधरींची यंत्रणा सज्ज; ७७ वर्षांची सेवा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव शनिवार (ता. ५) रोजी साजरा होत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मानवी मनोरे रचतात; मात्र मनोरे उभारताना किंवा कोसळल्याने अनेकांना दुखापत होते. अशा जखमी गोविंदांवर गेल्या चार दशकांपासून चौधरी कुटुंबीय मोफत उपचार करत आहेत. हाडवैद्य अवधूत चौधरी यांच्यासह कुटुंबाची तिसरी पिढीही या सेवेत कार्यरत आहे. यंदाही जखमी गोविंदांसाठी मोफत औषधोपचाराची तयारी करण्यात आली आहे. जुने जळगावातील ख्यातनाम हाडवैद्य कै. नामदेव सोनू चौधरी यांनी आयुर्वेदिक जडीबुटी व मानवी शरीररचनेचे ज्ञान वापरत दीनदुबळ्यांची सेवा केली. त्यांनी ७७ वर्षांपूर्वी गोविंदा व क्रीडापटूंवर मोफत उपचारांचा उपक्रम सुरू केला. त्यांचा सेवावसा पुढे मुलगा हाडवैद्य अवधूत चौधरी व नातू फिजिओथेरपिस्ट डॉ. स्वप्नील चौधरी अखंडपणे चालवत आहेत. अनेक पुरस्कार.. हाडवैद्य चौधरी यांच्याकडे गेल्या ७७ वर्षांपासून जखमी गोविंदा व क्रीडापटूंवर मोफत उपचार केले जात आहेत. आजवर सुमारे तीन हजार गोविंदांना वेदनांतून मुक्त केले असून, अनेकांना स्वखर्चाने औषधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. दरवर्षी दहीहंडीपूर्वी उपचारांची तयारी करून मंडळांना माहिती दिली जाते. या सेवाकार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. चौकट येथे करा संपर्क जखमी गोविंदांवर यंदाही मोफत उपचार केले जाणार असून जिल्हाभरातील दुखापत झालेल्या गोविंदांनी अस्थी संधनालय, जुने जळगाव, पांजरापोळ टाकीजवळ, ६०५, विठ्ठलपेठ, भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३९५०४३३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन चौधरींनी केले आहे. -----

US Diesel Price: अमेरिकेला महागाईच्या झळा! 'डिझेल'च्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ; दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या

मुंबईत आरे मेट्रो स्टेशनखाली भीषण आग, लक्झरी बसने अचानक घेतला पेट, धक्कादायक VIDEO समोर...

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 7 जणांना अटक

Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

SCROLL FOR NEXT