नाशिक

अज्ञात पिस्तुलधारी टोळीने बारा तासांत दोन ठिकाणी दरोडा

CD
पिस्तूलधारी टोळीकडून शहरात बारा तासांत दोन ठिकाणी दरोडा अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौकातील सट्टापेढीवर लूट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : शहरातील इच्छादेवी चौकाजवळ आणि अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या सट्टापेढीसह अवैध चक्री अड्ड्यावर पिस्तूलचा धाक दाखवून अज्ञात दरोडेखोरांनी लूट केल्याची घटना घडली. सट्टा व चक्री जुगार दोन्ही अवैध धंदे असल्याने याप्रकरणी पोलिसात अद्याप कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ एका रोलेट गेम (चकरी) च्या अड्ड्यावर मंगळवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास तीन तरुण आले. गर्दी असल्याने त्यांनी तिथून काढता पाया घेत जवळच वाईन शॉपवरून यथेच्छ मद्यप्राशन केले. अकराच्या सुमारास सट्टा पेढीवर पुन्हा जाऊन तिघांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील २५ ते ३० हजारांची रोकड लंपास केली. चौकट बारा तासांत दुसरी घटना लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३) रात्री नऊच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ एका सट्टापेढीवर पुन्हा तशाच पद्धतीने तोंड बांधून आलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ४० ते ५० हजारांची रोकड चोरून नेली आहे. चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीने आलेले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सट्टापेढीच्या चालकाकडून संबंधित पोलिसांनी माहिती घेत तक्रार न करण्याची व कुणासही काही झाल्याबाबत माहिती न देण्यास सांगितल्याने ही मंडळी गप्प झाली आहे. मात्र, परिसरात घटनेबाबत खुलेआम चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT