धुळे : टुडे पान १ साठी...ॲंकर
--
विरोधी पक्षनेतेपदावर चार आठवड्यांत निर्णय घ्यावा
--
खंडपीठाचे महापालिकेला निर्देश; ‘एमआयएम’तर्फे इर्शाद जहागीरदार यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद अखेर न्यायालयाच्या दरबारात पोहोचला असून यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय आगामी चार आठवड्यांच्या आत घेण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणाला दिले असल्याची माहिती ‘एमआयएमचे’ स्थानिक नेते इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. खंडपीठाच्या आदेशानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
-
येथील महापालिकेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने सत्तेची सूत्रे हाती घेतली असली तरी लोकशाहीसाठी महत्त्वाच्या असलेल्या विरोधी पक्षनेता निवडीचा तिढा आठ महिन्यांपासून लांबणीवर पडला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यावर कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने अस्वस्थ झालेल्या ‘एमआयएम’ पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘एमआयएम’तर्फे गटनेते अब्दुल लतीफ अब्दुल हमीद अन्सारी आणि इतरांकडून दाखल करण्यात आलेल्या यासंबंधी रिट याचिकेवर एक सप्टेंबरला न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
-
निर्णय घेणे बंधनकारक
‘एमआयएम’ने १२ फेब्रुवारीला धुळे महापौरांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने गुणवत्तेच्या आधारे योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित प्राधिकरणाला दिले असल्याचे श्री. जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, खंडपीठाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून चार आठवड्यांत हा निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले असून महापालिकेला तशी नोटीस बजावण्यात आल्याचेदेखील त्यांनी सांगितले. महापालिकेत सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी या पक्षापाठोपाठ ‘एमआयएम’चे १० नगरसेवक असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर त्यांनी दावा सांगितला आहे.
-
‘एमआयएम’चा दावा
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीने आपल्याकडे १३ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा केल्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच निर्माण झाली आहे. नियमांनुसार महापौर हे सभापती पीठाचे प्रमुख असल्यामुळे या नियुक्तीबाबत त्यांच्या अधिकार व जबाबदारीकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. या कायदेशीर घडामोडींमुळे ‘एमआयएम’च्या आशा पल्लवित झाल्या असून, हा सत्याचा विजय असल्याचे सांगत विरोधी पक्षनेतेपद ‘एमआयएमला’ मिळणार, असा दावा श्री. जहागीरदार यांनी केला आहे.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.