नाशिक

जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कारावर मोहोर

CD
फोटो : जिल्ह्यातील १५ शिक्षक ठरले ‘गुणवंत’ जिल्हा परिषदेची घोषणा; ४३ प्रस्तावांमधून गुणवत्तेच्या निकषांवर निवड सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने २०२६ या वर्षेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले. जिल्ह्यातून प्राप्त ४३ प्रस्तावांमधून एकूण १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षकांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची शाळा व वर्ग स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीची पडताळणी करण्यात आली. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गट बदल करून प्रत्यक्ष मूल्यांकनाची कार्यवाही करण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले गुणांकन, शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, कामकाजातील नाविन्यता, राबविण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले योगदान तसेच इतर निर्धारित निकषांचा विचारकरून जिल्हास्तरीय निवड समितीने एकूण १५ शिक्षकांची सर्वानुमते गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व १५ शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे त्याचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. २०२६ गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी तालुका.........शिक्षक व शाळा बागलाण....माधुरी पवार, अजमीर सौंदाणे (28695) चांदवड........सतीश अहिरे, काजीसांगवी (28696) देवळा........सतीश आहेर, आहेरवस्ती (28697) दिंडोरी.......भिलाजी पाटील, उमराळे खुर्द (28698) इगतपुरी.......अवधुत खाडगीर, पदवीधर शिक्षक, भरवीर खुर्द (28699) कळवण...... सविता भामरे, कळवण मुली नं. १ (28700) मालेगाव.....मीना देवरे, सौंदाणे नं. १(28701) नांदगाव........गणेश साळी, गंगाधरी मोठी (28702) नाशिक …......विवेक खैरनार, पदवीधर शिक्षक, महादेवपूर (28703) निफाड.........गौरी गायवन, तळेगाव वाट(28704) पेठ......योगेंद्र बोरसे, दोनवाडे (28705) सिन्नर....प्रकाश जगताप, मुख्याध्यापक, धोंडबार (28706) सुरगाणा.....सुधाकर भोये, सुरगाणा नं. १(28707) त्र्यंबकेश्वर.......संदीप गुंजाळ, वाघेरा (28708) येवला.....योगेश माकोणे, दुगलगाव (28709)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर

माजी भारतीय कर्णधार तारक राऊळ काळाच्या पडद्याआड; कबड्डी जगतावर शोककळा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

SCROLL FOR NEXT