नाशिक

तोरणमाळ परिसरात अवैध वृक्षतोड, वनविभागाचे दुर्लक्ष

CD
(टुडे पान एकवर मेन लिड) फोटो : NSK26H28717 / नंदुरबार : तोरणमाळ येथील सार्वजनिक रस्त्यालगतच्या कापलेला डेरेदार वृक्ष. NSK26H28716 (कृपया हा फोटो क्लोजअप घ्यावा) -------------------------- तोरणमाळ परिसरात अवैध वृक्षतोड, वनविभागाचे दुर्लक्ष औषधी व मौल्यवान वृक्षांच्या संख्येत घट; निसर्ग सौंदर्याला बसतोय धक्का सकाळ वृत्तसेवा नंदुरबार ता. ४ : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या तोरणमाळ परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होतांना दिसत आहे. वन विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वृक्षतोडीच्या नवनवीन आणि धक्कादायक क्लृप्त्या वापरल्यात जात असून, यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. पूर्वी वृक्षतोड करताना कुऱ्हाडीचा किंवा करवतीचा आवाज होऊन वन कर्मचाऱ्यांना सुगावा लागत असे. मात्र, आता आधुनिक आणि छुप्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. -------- झाडांच्या मुळांमध्ये विषारी रसायने किंवा ॲसिड टाकून झाड आधी वाळवले जाते. झाड पूर्णपणे सुकल्यानंतर ते आपोआप पडल्याचा आव आणून त्याची विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी झाडाच्या खोडाला गोल काप देऊन त्यातील अन्नद्रव्यांचा पुरवठा खंडित केला जातो. यामुळे काही दिवसांतच हिरवेगार झाड मृत होते. तसेच, रात्रीच्या वेळी बॅटरीवर चालणाऱ्या शांत सॉ-मशीनचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत मोठी झाडे कापली जातात. मौल्यवान वृक्ष मुख्य लक्ष्य छुप्या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने सागवान, ऐन, धावडा, सलाई आणि इतर औषधी व मौल्यवान वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तोरणमाळच्या दुर्गम भागातील टेकड्यांवर हे प्रकार अधिक प्रमाणात सुरू आहेत. दिवसा वन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून रात्रीच्या वेळी हे प्रकार घडत असतात.गुटखा आणि पान मसाला तयार करण्यासाठी खैराच्या झाडाची साल वापरली जाते.त्यापासून काथ तयार केला जातो.धावडाचा चिक लाडू आणि पापडमध्ये वापरला जातो. सलाईची साल धूप बनविण्यासाठी वापरात आणली जाते. तोरणमाळ परिसरात अशा मौल्यवान वृक्षांचीही तोड मोठ्या प्रमाणावर होत असते. पर्यावरणाला धोका वृक्षतोडीमुळे तोरणमाळ परिसरातील निसर्ग सौंदर्याला मोठा धक्का बसला आहे. डोंगर उघडे- बोडके होत असून, पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा आणि जमिनीची धूप होण्याचा धोका वाढला आहे. वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत असल्याने बिबट्या, अस्वल यांसारखे हिंस्त्र प्राणी आता मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. वन विभागाने लक्ष देण्याची गरज नवनवीन युक्त्या वापरून होणाऱ्या या वृक्षतोडीमुळे वन विभागाची गस्त घालणारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तोरणमाळ परिसरात विशेष मोहीम राबवावी. ड्रोन कॅमेरा वापर करून पाळत ठेवावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. --------------------- बेकायदेशीर झाड कापल्याने ग्रामपंचायतीचे वनविभागाला पत्र तोरणमाळ येथे सार्वजनिक रस्त्यावरील झाड अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वा करवतीने बेकायदेशिरपणे अंशत: कापले आहे. यामुळे झाडाला गंभीर नुकसान पोहचले आहे. सदर रस्ता हा तोरणमाळ ग्रामीण रूग्णालयाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. या रस्त्याने रूग्ण व नागरीकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच, रूग्णवाहिकादेखील याच रस्त्याने ये- जा करीत असतात. झाड अंशत: कापल्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जिवीतहानी व आपत्कालीन वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याचा तीव्र धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा. संबंधित दोषी व्यक्तींवर वृक्षतोड व वनकायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशा आशयाचे लेखी पत्र तोरणमाळ ग्रामपंचायतीने वनविभागाच्या तोरणमाळ परिक्षेत्राचे वनपाल यांना शुक्रवारी देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT