शंभरावर वृत्तपत्र छायाचित्रकारांचा अपघाती विमा
उपशीर्षक
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम; आमदार भोळे यांचे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : बातमीच्या शोधात दिवस-रात्र दुचाकीवरून धावपळ करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे वृत्तपत्र छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत अपघाती विमा शिबिर नुकतेच घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला.
या निर्णयामुळे त्यामुळे संबंधित पत्रकाराचा अपघाती मृत्यू किंवा विमा योजनेतील नियमानुसार अपघाती दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
आमदार भोळेंचे सहकार्य
या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले. पत्रकारांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोळे यांचे आभार व्यक्त केले.
हे विमा शिबिर प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख, प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजीत पाटील आणि सहसचिव हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडले.
पत्रकारांच्या व्यावसायिक कामासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी घेणे हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सुरक्षा उपक्रम राबविण्याचा मानस प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.