फोटो : NSK26H28718 (भारती मराठे)
फोटो : NSK26H28721 (हर्षा पटेल)
फोटो : NSK26H28722 (ज्ञानेश्वर पुराणिक)
फोटो : NSK26H28723 (अमरदिप महाजन)
फोटो : NSK26H28726 (सुनिल सुर्यवंशी)
फोटो : NSK26H28725 (किशोर पवार)
फोटो : NSK26H28727 (नरेंद्र गुरव)
-----------------------------------
गणित अध्यापक मंडळातर्फे
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संचलित नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून. जिल्ह्यातील सात शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये भारती युवराज मराठे (कमला नेहरू कन्या विद्यालय, नंदुरबार), ज्ञानेश्वर सदाशिव पुराणिक (वनिता विद्यालय, नवापूर), हर्षा सुदाम पटेल (शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर, शहादा), डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन (प्राचार्य भाईसो गो. हू. महाजन न्यू हायस्कूल, तळोदा), किशोर बन्सीलाल पवार (सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा), सुनील सुरेश सूर्यवंशी (प्राचार्य भाईसो गो. हू. महाजन न्यू हायस्कूल, तळोदा), नरेंद्र गोरख गुरव (सर्वोदय विद्यामंदिर. प्रकाशा) यांची निवड करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. उच्च शैक्षणिक अर्हता, पुस्तक प्रकाशन, लेख प्रकाशन, तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शन सहभाग, प्राप्त झालेले शासकीय निमशासकीय पुरस्कार, विद्या प्राधिकरण पुणे योगदान, अध्यापन विषयात विद्यार्थ्यांचे यश, गणित संबोध परीक्षा प्रविष्ट विद्यार्थी या ९ निकषांवर आधारित मुलाखती घेऊन निवड केली जाते. समिती अध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेशकुमार गवते, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ.संजय शिंदे, महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उद्धव तांबोळी, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सचिव दिलीप पाटील, सहसचिव चेतन पाटील आदी मान्यवरांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार्थींची निवड केली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्करांचे स्वरूप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.