नाशिक

शिक्षक दिन स्‍टोरी २

CD
ॲंकर : शहर- जिल्हा पानावरही घ्यावी --- लोगो : शिक्षक दिन विशेष ––– NSK26H28740 सातगाव तांडा (ता. पाचोरा) : जिल्‍हा परिषद शाळेत फुलविलेल्‍या पसरबागेत शाळेतील शिक्षक. ––– NSK26H28741 पसरबागेत बहरलेली झेंडूची फुलझाडे. ––– NSK26H28754(नामदेव पाटील) ––– जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी फुलविली परसबाग (उपशीर्षक) सातगाव तांडा येथे नामदेव पाटील यांचा पुढाकारातून बहरली २०० फुलझाडे सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ४ : शाळेचा परिसर केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता तो निसर्ग, पर्यावरण आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शिक्षणाची प्रयोगशाळा ठरावा, या उद्देशाने सातगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने घेतलेल्या पुढाकारातून शाळेत सुंदर परसबाग फुलविली आहे. तब्बल २०० विविध झाडांसह रंगीबेरंगी फुलबाग बहरल्याने ही परसबाग जिल्ह्यात विशेष ठरत आहे. पाचोरा तालुक्‍यातील सातगाव तांडा येथील जिल्‍हा परिषद उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक नामदेव गोविंदा पाटील यांच्‍या पुढाकारातून शाळेचे रूप पालटले आहे. २०१६ मध्‍ये नामदेव पाटील यांची शाळेवर नियुक्‍ती झाली, त्‍यावेळी चौथीपर्यंत वर्ग व ३६ इतकीच पटसंख्‍या होती. आता आठवीपर्यंत शाळा झाली असून शाळेतील पटसंख्‍या वाढून १३५ वर आली आहे. यासोबतच नवीन शाळाखोल्‍या, शाळा परिसराला तारेचे कुंपण झाल्‍याने शाळेच्‍या आवारात परसबाग फुलविणे सहज सोपे झाले. तसेच प्रत्‍येक वर्गखोल्‍यांमध्‍ये भिंतीवर शाळेचा अभ्‍यासक्रम पेंटिंग करून रेखाटला आहे. २०० झाडांची हिरवीगार शाळा परसबागेत विविध प्रकारची जांभूळ, चिंच, फस, चिकू, पपई, नारळ २०० प्रकारची फळझाडे लागवड करून ती वाढविली. याशिवाय भाजीपाला तसेच इतर उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली आहे. सध्या शाळेच्या परिसरात सुमारे २०० झाडे डौलाने उभी असून, त्यांची विद्याथ्‍र्यांच्‍या मदतीने नियमित देखभाल केली जात आहे. मुलांना यासाठी सामुहिक जबाबदारी सोपविली आहे. अर्थात सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा उपक्रम आता बहरला असून, शाळेच्या परिसराला हिरवाईची नवी ओळख मिळाली आहे. फुलबागेने वाढविले सौंदर्य परसबागेसोबतच शाळेच्या परिसरात आकर्षक फुलबागही विकसित करण्यात आली आहे. विविध रंगांची फुले उमलल्याने शाळेचा परिसर अधिक सुंदर आणि प्रसन्न झाला आहे. सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आता हिरवाई आणि फुलांच्या सुगंधाने होत आहे. त्यामुळे शाळेतील वातावरणही आनंददायी बनले आहे. इन्‍फो मुलांसोबत पालकांचाही सहभाग शाळेच्‍या मागे असलेल्‍या विहिरीतून जलवाहिनी करून परसबागेसाठी ठिबक सिंचन केले. यासाठी शाळेला मिळालेले अनुदानाची काही रक्‍कम तसेच शाळेतील प्रत्‍येक शिक्षक व ग्रामस्‍थांकडून मदत मिळत आहे. अर्थात मुलांसोबत त्‍यांच्‍या पालकांचा १०० टक्‍के सहभाग असतो. कोट लागवड, झाडांची निगा आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे सातगाव तांडा येथील शाळेची परसबाग जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करीत आहे. - नामदेव पाटील, शिक्षक, जि.प.शाळा सातगाव तांडा. –––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Pune Festival : पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Marathi News Live Updates : वाद, चर्चा थांबवा, उत्सवाकडे लक्ष केंद्रित करा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सूचना

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

SCROLL FOR NEXT