नाशिक

मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहावे

CD
मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहा सकल मराठा समाजाच्या बैठकीत सरकारला आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाची शुक्रवारी (ता. ४) बैठक झाली. कालिका मंदिराच्या सभागृहत झालेल्या या बैठकीत आरक्षणा मुद्दा हा महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठा समाजाच्या भवितव्याशी निगडित असल्याने सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहावे, असा एकमुखी सूर या वेळी पुढे आला. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी आजपर्यंत समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी बैठक का घेतली नाही? समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा का केली नाही? असे प्रश्‍न बैठकीत उपस्थित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला न्याय देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगतात. पण, आरक्षण उपसमिती स्थापन केली असल्यास त्याचे कामकाज नेमके कुठपर्यंत पोहोचले, याची माहिती द्यावी. अध्यक्षांकडून आणि समितीतील संबंधित मंत्र्यांकडून कामाचा अहवाल घेतानाच समितीच्या किती बैठका झाल्या, त्यात कोणते निर्णय झाले आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली, हे समाजासमोर का मांडले जात नाही? असे मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारावी. मंत्री विखे-पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. सकल मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर, चंद्रकांत बनकर, अण्णासाहेब पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT