नाशिक

तृतीयपंथीतृतीयपंथीयांना हक्कांची जाणीवयांना हक्कांची जाणीव

CD
NSK26H28756 जळगाव : तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे. समोर तृतीय पंथीय. ------- तृतीयपंथीयांना हक्कांची जाणीव करून देणे प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकारी घुगे : जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : तृतीयपंथीय समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी शासकीय योजनांसोबतच त्यांच्या अडचणी समजून घेणारी सहवेदना आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी मतदान कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, स्वयंरोजगार, उद्यम नोंदणी, कर्जपुरवठा, बीज भांडवल, अनुदान व सबसिडी योजनांची माहिती दिली. आयुष्मान भारत कार्डही उपलब्ध करून देण्यात आले. बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगारातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. शिबिरास निवडणूक शाखेचे तहसीलदार रणजीत कुमावत, संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार प्राजक्ता केदार, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. रमेश थापते, सेंट्रल बँकेचे वरिष्ठ प्रबंधक भारत जाधव, पुरवठा निरीक्षक दीपाली राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पाचोरा येथील सीमा जान गुरू, धरणगावच्या नैना भगवान पाटील, चाळीसगावच्या फिजा गुरू, जळगावच्या अंजली गुरु, संजना जान यांची विशेष उपस्थिती होती. ------ चौकट.. ‘समस्या संवेदनशीलतेने समजून घ्या’ विभागीय समितीच्या सह अध्यक्षा शमिभा पाटील म्हणाल्या, प्रशासनाने समस्या केवळ कागदोपत्री न ठेवता त्या संवेदनशीलतेने समजून घेऊन प्रत्यक्ष कृतीतून सोडवाव्यात.

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

SCROLL FOR NEXT