नाशिक

क्रिकेटच्‍या पंच समितीवर अमृता, प्रियंकाची निवड

CD
फोटो : H28760, H28762, H28763 - क्रिकेटच्‍या पंच समितीवर अमृता, प्रियांकाची निवड पहिल्यांदाच नाशिकच्या दोन महिला नियुक्त; मधुराचेही यश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत नाशिकच्या अमृता गाडगीळ, प्रियांका घोडके व किशोरवयीन मधुरा दायमा यांनी यश मिळवले आहे. २०२५-२६ च्या हंगामात खास महिलांसाठी झालेल्या पात्रता, लेखी, प्रात्यक्षिक व त्यानंतरच्या तोंडी परीक्षा घेतली. गाडगीळ यांनी एकूण ८५.३३ टक्के गुण मिळवले. प्रियांका घोडकेने ८५ टक्के व मधुरा दायमा ८०.६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. गाडगीळ या निवेक क्लबवर क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. क्रिकेटपटू प्रियांका सक्रिय खेळाडू असून नाशिक जिल्हा महिला वरिष्ठ संघाच्या कर्णधार आहेत. गेली बरीच वर्षे त्यांनी विविध वयोगटात जिल्हा तसेच महाराष्ट्राचेदेखील प्रतिनिधित्व केले आहे. मधुरादेखील १९ वर्षांखालील नाशिक जिल्हा संघ व राज्याकडून खेळते. नाशिकच्या प्रियांका व अमृता या दोनही महिला पंचांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समितीवर नियुक्ती झाली आहे. मधुरा दायमाला मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ही संधी मिळेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समितीवर २०२३ पासून सातत्याने दरवर्षी नाशिकमधील चार-पाच जणांची निवड होत आहे. एमसीए पॅनलवर नियुक्त झालेल्या नाशिकमधील या पहिल्याच महिला क्रिकेट पंच असाव्या. यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, महाराष्ट्रभर दरवर्षी नियमितपणे होणाऱ्या, राज्यस्तरीय खुल्या तसेच विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत पंचगिरीसाठी त्यांना प्राधान्य मिळेल. या तिघींना आंतरराष्ट्रीय सामन्यातील अनुभवी पंच व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच समिती प्रमुख विनीत कुलकर्णी, रणजी सामन्यातील पंच संदीप गांगुर्डे, संदीप चव्हाण, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच समिती सदस्य अजय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेतील यशाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांच्‍यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत शुभेच्‍छा दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात डीजेबंदी होणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विद्यानंद बापटांच्या मराठीचं केलं कौतुक

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

Stray Dog Attack : उंब्रज येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार! ८० वर्षीय आजी गंभीर जखमी; चार गायी अन् पाळीव प्राण्यांवर हल्ला

Marathi News Live Updates : पुण्यात डीजेविरोधात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाची हाक

Maratha Reservation : २२ गावांतील मराठा बांधवांचा महामार्गावर रास्ता रोको

SCROLL FOR NEXT