फोटो : NSK26H28772
नंदुरबार : उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांचा सत्कार करताना सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे. शेजारी मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, सहायक अभियंता राकेश चौधरी.
------------------------------
अभियंता विनोद काळे यांचा गौरव
वीजचोरी उघडकीस आणल्याबद्दल सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : तालुक्यातील घुली परिसरात दोन कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी उघडकीस आणणारे उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांचा महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ३) नंदुरबार येथे विशेष सत्कार करण्यात आला.
महावितरणच्या नंदुरबार ग्रामीण-१ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद काळे हे काही दिवसांपूर्वीच रुजू झाले. महिनाभरातच त्यांनी घुली शिवारात दोन कारखान्यांतील ४७ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले. याप्रकरणी तीन संशयितांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कामगिरीबद्दल गुरुवारी श्री. काळे यांचा महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. औद्योगिक ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात होणारा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणून काळे यांनी महावितरणच्या महसुलाचे नुकसान टाळले. इतर अभियंत्यांनीही यापासून प्रेरणा घेत आपापल्या कार्यक्षेत्रात वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवावी, असे आवाहन दिलीप जगदाळे यांनी केले. या वेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, नंदुरबार मंडलाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, नंदुरबार विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, सहायक अभियंता राकेश चौधरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.