नाशिक

वाटिकाश्रम परिसरात घरफोडी; ३२ हजारांचा ऐवज लंपास

CD
वाटिकाश्रम परिसरात घरफोडी; ३२ हजारांचा ऐवज लंपास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.४ : कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दोन अंगठ्यांसह चांदीची मूर्ती, कुयरी व दिवा असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना वाटिकाश्रम परिसरात २३ ऑगस्टला उघडकीस आली. याप्रकरणी ३ सप्टेंबरला तालुका पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाटिकाश्रम परिसरातील रहिवासी शिवाजी बळीराम पाटील (वय ६३) हे २१ ऑगस्टला पत्नीसह सुरत येथे भावाकडे गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती, चांदीची कुयरी व चांदीचा दिवा असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी शेजाऱ्यांनी पाटील यांना घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पाटील घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी याबाबत ३ सप्टेंबरला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी धनराज पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

Pune News : राज्यसेवा मुलाखतीसाटी ‘बार्टी’कडून आर्थिक सहाय्य

SCROLL FOR NEXT