नाशिक

पाच थरांचा मनोरा रचत विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी

CD
NSK26H28779 जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दहीहंडी उत्सवात पाच थरांचा मनोरा करत हंडी फोडताना विद्यार्थिनी. ------ पाच थरांचा मानवी मनोरा रचत विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी! उपशीर्षक गोदावारी नर्सिंगमध्ये पाचव्या प्रयत्नात यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाच थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. हंडी फोडण्यासाठी चार वेळा प्रयत्न केल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश आले. कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्या विशाखा गणविर, उपप्राचार्य जेसिंथ ढाया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. केतकी पाटील नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, परिचारीका अधीक्षक संकेत पाटील आदी उपस्थित होते. विशाखा वाघ यांनी प्रास्ताविक केले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान गोपाळ कृष्णाचे पूजन व पाळणा करण्यात आला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींच्या पथकांनी मानवी मनोरा रचण्यास सुरवात केली. चार प्रयत्नांनंतर पाचव्या प्रयत्नात पाच थरांचा मनोरा रचून विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडली. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT