नाशिक

इच्छादेवी चौक ते मास्टर कॉलनीदरम्यान अतिक्रमण हटविले

CD
NSK26H28798 जळगाव : महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाने पेव्हर ब्लॉकचे केलेले अतिक्रमण काढताना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी. यावेळी उपस्थित उपायुक्त पंकज गोसावी, वाहतूक पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर. .... महामार्गावरील अतिक्रमण हटविले ४४ वाहनांवर दंड; हॉटेलचालकाशी पथकाचा वाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी महामार्गावर संयुक्त कारवाई केली. इच्छादेवी चौक परिसरापासून सुरू झालेल्या या मोहिमेत रस्त्याच्या साइडपट्ट्यांवर बेशिस्तपणे उभी केलेली वाहने हटविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, महापालिका उपायुक्त पंकज गोसावी आणि अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. जिओ पेट्रोलपंप परिसरात रस्त्यावर टाकण्यात आलेले भंगार साहित्य मनपाच्या पथकाने जप्त केले. तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर दंड ठोठावण्यात आला. चौकट शाब्दिक वाद; कारवाई सुरूच यानंतर मास्टर कॉलनीकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. दरम्यान, महामार्गालगत एका हॉटेल व्यावसायिकाने महामार्गावरील जागेवर पेव्हर ब्लॉक बसविल्याचे निदर्शनास आले. हे अतिक्रमण हटविताना मनपा पथक आणि व्यावसायिक यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र, पथकाने कारवाई सुरू ठेवत संबंधित अतिक्रमण हटविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

Vastu Tips: संध्याकाळ होण्यापूर्वी घरात करा ‘ही’ ३ कामं; घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण!

Marathi News Live Updates : भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

Jintur News : जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

SCROLL FOR NEXT