बोदवडमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
---
६० रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी; ४२ संशयित दुचाकींची चौकशी; १० हजार ७८० रुपयांचा दारूसाठा जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : बोदवड पोलिसांनी गुरुवारी (ता. ४) कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात ६० रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी केली. पैकी तीन जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या विशेष मोहिमेत दोन पोलिस उपअधीक्षक, आठ पोलिस अधिकारी, १३० अंमलदार व आरसीपी पथक सहभागी झाले होते.
५५ लिटर गावठी दारू जप्त
पोलिसांनी ५५ लिटर गावठी दारू आणि ६६ देशी दारूच्या बाटल्या, असा एकूण १० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ४२ संशयित दुचाकी आढळून आल्या. त्यांची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत तपासणी सुरू आहे. आरटीओ विभागामार्फतही वाहनांची तपासणी करण्यात येत असून, अनियमितता आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई होणार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर विभागाचे उपअधीक्षक नंदराज पाटील, परिविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह अधिकारी, अंमलदार व आरसीपी पथकाने केली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण, अवैध व्यवसायांना आळा आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अवैध दारूविक्री, अंमली पदार्थ, जुगार किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.