NSK26H28422
खडकीसीम (ता. चाळीसगाव) ः तेहतीस कोटी ईश्वर मंदिर प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
खडकीसीममध्ये ३३ कोटी देवांचे मंदिर
---
दर्शन सभागृहासह गुरूकुल, ग्रंथालय, गोशाळा, संग्रहालय उभारण्याचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मेहुणबारे (ता. चाळीसगाव), ता. ४ : चाळीसगाव- धुळे महामार्गालगत खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथे तेहतीस कोटी ईश्वर मंदिराचे भूमिपूजन मंत्रघोष, सनई-चौघड्याच्या निनादात झाले. सुमारे चार एकरावर भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुणे येथील उद्योजक कैलास नंदा, अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, वृंदावन-मथुरा येथील गौ संशोधक व ‘गौ पुराण’ ग्रंथाचे लेखक संत सुभाष महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. धुळे येथील निफाडकर गुरुजी व ब्रह्मवृंदांनी पूजा, विधी व होमहवन केले. परिसरातील २१ जोडप्यांनी यजमान म्हणून भाग घेतला.
विविध प्रकल्प साकारणार
येथील वैष्णवी लॉन्सवर जाहीर सभा झाली. मंदिर प्रकल्पाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुनील सोनवणे यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाची माहिती दिली. संत सुभाष महाराज व स्वामी भारतानंद सरस्वती यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण, आशाताई कुंभार (चव्हाण), संजय शर्मा, संभाजी महाराज, वासुदेव महाराज आदी उपस्थित होते. या ठिकाणी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील भाविकांसाठी तीन दर्शन सभागृह उभारण्याचे नियोजन आहे. मंदिरात प्रवेशापूर्वी धर्म, संस्कृती, शास्त्र व देव-देवतांविषयी माहिती देण्याची संकल्पना आहे. शिवाय गुरुकुल, ग्रंथालय, वाचनालय, गोशाळा आणि विविध देशांतील पुरातन हिंदू मंदिरांच्या मूर्ती व पुराव्यांचे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमात परिसरातील १३० हिंदुत्ववादी कार्यकर्ते व गोरक्षकांचा सत्कार झाला. आकाशवाणी कलाकार कल्याणी कच्छवा यांनी सूत्रसंचालन केले. खडकीसीमसह मेहुणबारे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.