एन्कर
कचरा वर्गीकरणावर सक्तीचे, अन्यथा दंड
महापालिका प्रशासनाचा इधारा, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नाशिक महापालिकेने शहरात १ एप्रिलपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ ची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कचरा वर्गीकरण सक्तीचे राहणार असून, येत्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नवीन नियमांनुसार कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण करणे सक्तीचे आहे. प्रत्येक नागरिक आणि संस्थेने विविध चार प्रकारांत कचरा वेगळा करून देणे बंधनकारक केले आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा, आणि विशेष काळजी घेऊन हाताळायचा कचरा यांचा समावेश आहे. कचरा उघड्यावर, रस्त्यांवर किंवा नाल्यांमध्ये फेकणे आणि सार्वजनिक ठिकाणी जाळण्यावर बंदी घातली आहे. रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार ००० चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम क्षेत्र असलेल्या किंवा रोज ४० हजार ००० लीटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या आस्थापनांना ''बल्क वेस्ट जनरेटर'' म्हणून घोषित केले आहे. यामध्ये मोठ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स व शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. या आस्थापनांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. ओल्या कचऱ्यावर स्वतःच्या आवारातच कंपोस्ट किंवा बायोगॅस प्रकल्पाद्वारे प्रक्रिया करणे बंधनकारक असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------ कोट
स्वच्छ आणि शाश्वत नाशिकसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. ''माझा कचरा, माझी जबाबदारी'' या भूमिकेतून सर्वांनी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व विल्हेवाट प्रक्रियेत सहभागी व्हावे.
- अमित रंजन,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.