शहर टुडे पान तीनवर आजच घ्यावी
-------
NSK26H28802
गाढोदा (ता.जळगाव) : केळी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत बोलताना मान्यवर व उपस्थित शेतकरी.
--------------------
केळी शेतकरी-शास्त्रज्ञ
मंचची गाढोद्यात बैठक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : येथील केळी संशोधन केंद्राअंतर्गत केळी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक तालुक्यातील गाढोदे येथील अरुण पाटील यांच्या केळी प्रक्रिया केंद्रावर नुकतीच झाली. या बैठकीला शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक व कृषी क्षेत्रांतील मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र निकम होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते. मंचाचे उपाध्यक्ष विनोद बोरसे, सहसचिव रूपम पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ विस्तार समितीचे सदस्य नरेंद्र पाटील, कृषीभूषण पुरस्कार विजेते अनिल सपकाळे आदी उपस्थित होते. सुरुवातीस महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ॲड. सुरेश सोनवणे (हातेड ता.चोपडा), जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, डॉ. शरद जाधव (विषय विशेषज्ञ), केळी संशोधन केंद्राच्या प्रा. अंजली मेंढे, समाधान पाटील, केळी संशोधन केंद्राचे डॉ. व्ही. टी. गुजर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कुर्बान तडवी यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा व कृषी क्षेत्रात उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन केले. भगवान पाटील, अरुण पाटील, संजय पाटील (गाढोदे) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल श्री. तडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रेमराज एम. पाटील यांनी केले. गोपाल पाटील (गाढोदे) यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.