नाशिक

जामनेर-पाचोरा तालुक्यात चौदाशे हेक्टर जमीन सिंचित होणार

CD
जामनेर-पाचोरा तालुक्यात चौदाशे हेक्टर जमीन सिंचित होणार उपशीर्षक ‘भागपूर उपसा’ला वेग; दोन तलावांसाठी ८० कोटींच्या निविदेसह कार्यादेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तालुक्यांना समृद्ध करणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेंतर्गत एकूण १,३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील गोलटेकडी (ता. पाचोरा) लघुपाटबंधारे तलाव आणि एकुलती (ता. जामनेर) साठवण तलावाच्या बांधकामासाठी ८० कोटींची निविदा काढली असून, काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेशही दिले आहेत. भागपूर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात तापी नदीवरून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी पंपांद्वारे उचलून भागपूर धरणात साठविण्याचे नियोजन आहे, तर दुसऱ्या टप्प्यात भागपूर प्रकल्पातून पाणी उचलून गोलटेकडी लघुपाटबंधारे तलाव आणि एकुलती साठवण तलावात साठवणार आहेत. यामुळे या प्रकल्पांमध्ये वर्षभर पाणीसाठा उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे. चौदाशे हेक्टर जमीन सिंचनाखाली गोलटेकडी लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता सहा दशलक्ष घनमीटर असून, त्याद्वारे हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. एकुलती साठवण तलावाची क्षमता १.७५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यातून ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दोन्ही प्रकल्पांमधून एकूण १,३९५ हेक्टर शेतीला सिंचनाचा शाश्वत आधार मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची या दोन्ही प्रकल्पांसाठी दीर्घकाळापासून मागणी होती. पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीसमोरील अडचणी वाढत होत्या. आता या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पांचे काम मार्गी लागले आहे. सिंचनाची सोय झाल्याने जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यास मदत होणार आहे. --- कोट ‘भागपूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून ते साठवण तलावांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी, पिकांच्या उत्पादनात वाढ आणि गावागावांत समृद्धी आणण्याच्या दिशेने भागपूर उपसा सिंचन योजना महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT