धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 28810....धीरज कलंत्री
--
‘मेरिट’नुसार राष्ट्रवादी- शिवसेनेचा हक्क
-
धुळे महापालिका विरोधी पक्षनेतेपद; नगरसेवक कलंत्री यांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : येथील महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला असून, ‘एमआयएम’पाठोपाठ आता राष्ट्रवादी- शिवसेना शहर विकास आघाडीनेही या पदावर दावा ठोकला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संख्याबळ आणि ‘मेरिट’च्या निकषांवर आमचीच आघाडी अव्वल असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडेच राहील, असा दावा शिवसेनेचे प्रभाग १७ चे नगरसेवक धीरज कलंत्री यांनी केला आहे.
-
या संदर्भात पत्रकार परिषदेत नगरसेवक कलंत्री यांनी महापालिकेतील पक्षीय संख्याबळाच्या आधारे भूमिका स्पष्ट केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चार आठवड्यांच्या आत ‘मेरिट’नुसार विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा आदेश येथील महापालिकेला दिला आहे. या कायदेशीर प्रक्रियेत आमची आघाडी पूर्णपणे ‘फिट’ बसत असून, काही पक्षांकडून आदेशाचा वेगळा अन्वयार्थ लावत नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
मोठा गट आमचा
महापालिकेतील अधिकृत गटनोंदणीची आकडेवारी मांडताना कलंत्री यांनी स्पष्ट केले, की महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे ५० सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी- शिवसेना शहर विकास आघाडीचे १३ आणि एमआयएमचे १० सदस्य आहेत. विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडीची १३ सदस्यांची एकत्रित व अधिकृत गटनोंदणी झालेली आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत आणि संख्याबळाच्या आधारे महापालिकेतील दुसरा सर्वात मोठा गट आमचाच ठरतो, असे त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’च्या १० सदस्यांच्या तुलनेत आघाडीचे संख्याबळ जास्त असल्यामुळे नियमानुसार हे पद आम्हालाच मिळायला हवे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
-
आघाडीचाच हक्क
लोकशाहीत महापौरांइतकेच विरोधी पक्षनेते आणि सभापतीपद महत्त्वाचे असते. सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांमध्ये काही त्रुटी राहिल्यास किंवा सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यास जनतेच्या वतीने जाब विचारण्याचे काम विरोधी पक्षनेता करत असतो. विभागीय आयुक्तांच्या नोंदी स्पष्ट असताना महापौरांनी नैतिकतेच्या आधारे हे पद आधीच घोषित करायला हवे होते, अशी पुष्टी त्यांनी जोडली. निवडणुकीनंतर एकत्र येऊन १३ सदस्यांचा एकसंध गट स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचाच हक्क आहे. खंडपीठाच्या आदेशानंतर लवकरच यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास नगरसेवक कलंत्री यांनी व्यक्त केला.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.