नाशिक

४५ विद्यार्थी जखमी

CD
बस-ट्रक धडकेत ४५ विद्यार्थी जखमी --- देऊर- म्हसदीदरम्यान घटना; मानव विकास मशिनची बस सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ ः विद्यार्थ्यांना घेऊन धुळ्याहून म्हसदीकडे जाणारी मानव विकास मिशन योजनेतील बस आणि ट्रकमध्ये झालेली समोरासमोर धडक भीषण ठरली. या अपघातात बसमधील तब्बल ४० ते ४५ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी सातच्या सुमारास देऊर व म्हसदीदरम्यान बाबा बंगाली मंदिरापुढे विश्वनाथ मंदिराजवळ घडली. धुळे ते म्हसदी मार्गावर धावणारी मानव विकास मिशन बस (एमएच ०६, एस ८५८९) नेहमीप्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन म्हसदीच्या दिशेने जात होती. ती विश्वनाथ मंदिराजवळ आली असता, समोरून येणाऱ्या ट्रकशी (एमएच १८, एए ५८८८) बसची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत बसमधील विद्यार्थी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले. आपत्कालीन उपचार अपघाताची माहिती मिळताच गरिकांनी जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही गंभीर विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असून, काहींवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच पालक व नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. जखमी विद्यार्थ्यांची नावे अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दर्शना संतोषी पाटील, माधुरी धनराज सूर्यवंशी, संजीवनी जयराम भदाणे, गायत्री कौतिक साळुंखे, जान्हवी रवींद्र पाटील, अश्विनी चंद्रकांत पाटील, नीता प्रवीण पाटील, नंदिनी देवीदास नेरकर, सानिया सलीम पिंजारी, प्राची रावसाहेब भदाणे, नंदिनी धनराज साबळे, नीलेश्वरी यशवंत खैरनार, पल्लवी प्रभाकर गायकवाड, मृणाल प्रकाश अहिरराव, उषा शिंदे, नंदिनी साळुंखे, हर्षदा साळुंखे, जान्हवी भामरे, मालती साळुंखे, ऋतिका शेवाळे, सृष्टी राकेश देवरे, यशस्वी अनिल खैरनार, डिंपल ज्ञानेश्वर शिंदे, स्नेहा देवीदास शेवाळे, जान्हवी वैभव सूर्यवंशी, वैष्णवी ज्ञानेश्वर शिंदे आदींचा समावेश आहे. नेत्यांकडून विचारपूस घटनेची माहिती मिळताच आमदार मंजुळा गावित यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते उपचार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सागर गावित, माधव नांद्रे, बाळा शिंदे, प्रफुल्ल नेरे यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची प्रकृतीची विचारपूस केली व डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत विद्यार्थ्यांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT