नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील धर्मशाळांकडे लक्ष

CD
पंचवटीतील धर्मशाळांच्या डागडुजी अन् पुनर्रचनेला वेग यात्रेकरूंसाठी सुविधा वाढविण्याची गरज; निवासक्षमता वाढीवर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना पंचवटी परिसरातील जुन्या धर्मशाळांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची मोठी गरज निर्माण होणार असल्याने धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. पंचवटीतील काही धर्मशाळा नव्याने बांधण्यात येणार असून सिंहस्थासाठी विविध शासकीय व खासगी जागांसह धर्मशाळा आणि ट्रस्टच्या इमारतींच्या माध्यमातून निवासक्षमता उभारण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पंचवटीत सिंघानिया धर्मशाळा, एमबीए ट्रस्ट, सीताभवन धर्मशाळा, अडवानी धर्मशाळा अशा अनेक धर्मशाळा आहेत. भाविकांच्या निवासाच्या दृष्टीने या धर्मशाळा महत्त्वाच्या ठरतात. रामतीर्थ, पंचवटी आणि गोदाघाटाच्या जवळ असलेल्या या वास्तूंचे वैशिष्ट्य़ म्हणजे धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ आणि माफक शुल्कामध्ये निवास मिळतो. मात्र सिंहस्थाच्या निमित्ताने या धर्मशाळांसमोर केवळ रंगरंगोटीचा नव्हे, तर पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षितता, अग्निसुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे नियोजन हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर रामतीर्थ परिसरातील सुमारे चार ते पाच दशकांपासून उभ्या असलेल्या काही धर्मशाळा नव्याने बांधण्यात येत आहेत. त्यावेळी येथे श्राद्ध व अन्य और्ध्वदेहिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था पर्यायी जागेत करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या धर्मशाळांमध्ये छोट्या मोठ्या कामांना सध्या सुरुवात झाली आहे. नाशिकमधील धार्मिक व सेवाभावी संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ८४ संस्थांनी नोंदणी केली असून त्यापैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. धार्मिक स्थळांना निधी मंजूर होतो मात्र धर्मशाळांसाठीही काही भरीव तरतूद करावी जेणेकरून भाविकांची व्यवस्था करता येईल, अशी मागणी येथील स्थानिक करीत आहेत. पंचवटीतील धर्मशाळांसाठी सिंहस्थ ही केवळ परीक्षा नसून जुन्या धार्मिक वास्तूंना आधुनिक सुविधा देत त्यांचे मूळ स्वरूप आणि सेवाभावी परंपरा टिकविण्याची संधी ठरू शकणार असल्याने या धर्मशाळांकडेही त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. ---चौकट ही आहेत आव्हाने मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सामावून घेण्याची क्षमता, पुरेशी स्वच्छतागृहे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, आपत्कालीन मार्ग आणि सीसीटीव्ही, जुन्या वास्तूंचे मूळ स्वरूप कायम ठेवणे आणि सिंहस्थानंतरही भाविकांसाठी या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवणे हे धर्मशाळेसमोरील प्रश्‍न आहेत, त्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्‍यक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi कमी होता, त्यात आणखी एकाची भर पडली! २० वर्षीय टीममेटचा कहर, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Pune indigenous defence tech: पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञांचा स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित ड्रोन, स्वायत्त बोटींद्वारे जलसुरक्षेत क्रांती

Blood Pressure: हाय बीपीवर फक्त मीठ कमी करण्याचा उपाय पुरेसा नाही; पोटॅशियम वाढवणेही गरजेचे! संशोधनातून नवा खुलासा...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: राज्यातील भरती परीक्षेसाठी राज्य शासनाकडून ७ अधिकाऱ्यांची सुधारणा समिती गठीत

SCROLL FOR NEXT