तपोवनात दोन फ्लॅट फोडले
शहरात चार घरफोड्या; आठ लाखांच्या ऐवजावर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : तपोवन परिसरातील पद्मावती सोसायटीमधील प्लॅट नं. १० व १५ चे कडीकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. शांताराम बळिराम गवांदे व भगवान शिंदे (दोघे रा. पद्मावती सोसायटी, तपोवन) यांच्या बंद घरात शुक्रवारी (ता.४) दुपारी ही घरफोडी घडली. गवांदे यांच्या घरातून १ लाख ६३ हजारांचे दागिने व रोकड तर, शिंदे यांच्या घरातून १ लाख ५७ हजारांचे दागिने व रोकड असा ३ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
वडाळ्यातील सादिकनगर येथील सागर रामदास शिंदे (३५, रा. जेलरोड) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि २ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. सदर घरफोडी २ ते ३ सप्टेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक जोशी तपास करीत आहेत. सातमाऊली चौक, श्रमिकनगर येथील झेडपी कॉलनीतील एका बंद घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोकड, असा ६१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबवला. शोभा गणेश शिंदे (४६) यांच्या फिर्यादीवरून, सदर प्रकार २ ते ४ सप्टेंबरदरम्यान झाला. सातपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार दीपक खरपडे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.