नाशिक

पालकमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटीलगुलाबराव पाटील

CD
(टुडे १ : शहर-जिल्हा ॲंकर कॉमन) --- NSK26H28844 (फोटो ठळक घ्यावा) जळगाव : जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील आदी. ------- शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ‘दीपस्तंभ’ बनावे पालकमंत्री गुलाबराव पाटील : १५ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : बदलत्या काळात शाळांची पटसंख्या वाढविणे आणि टिकविणे हे आज शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे; मात्र हे आव्हान समर्थपणे पेलण्याची ताकदही आपल्या शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे शिकविण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘भविष्याचे शिल्पकार’ बनावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे येथील भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना पालकमंत्री पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वेतनवाढीसाठी प्रयत्न पालकमंत्री पाटील म्हणाले, की काळ बदलतोय, तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे; पण ‘कितीही फाइव्ह जी- सिक्स जी येऊ द्या, गुरु-जींशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बंद असलेली आगाऊ वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहील. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, शिक्षणप्रेमी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रा. पाटील, आमदार पाटील, प्राचार्य डॉ. झोपे यांनी मनोगत मांडले. पुरस्कारप्राप्त गिरीश महाजन व मनीषा शिरसाठ या दोन शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक नाना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी आभार मानले. चौकटीत पुरस्कारार्थी शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये योगेश्वर पाटील (आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्कर (कुरवेल तावसे बुद्रुक, ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर) आणि गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर) यांचा समावेश आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड...

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mangalwedha News : दामाजीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT