नाशिक

एआय विषयावर मार्गदर्शन

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... शिल्लक बातमी -- दोंडाईचात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरावर कार्यशाळा -- रावल महाविद्यालयात हाऊ टू हॅण्डल ॲन्ड युज एआय विषयावर मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षकांना एआय आणि विविध साधनांचा (टूल्स) प्रभावी, सुरक्षित व जबाबदार वापर करता यावा, या उद्देशाने दोंडाईचा येथील दादासाहेब रावल फार्मसी महाविद्यालयात ‘हाऊ टू हॅण्डल ॲन्ड युज एआय इन टीचिंग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. - परफेक्ट कॉम्प्युटरचे मालक रामचंद्र रामोळे आणि त्यांचे सहकारी रुतुराज राजपूत यांनी मुख्य वक्ता म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी चॅटजीपीटी, गुगल जेमिनी, ग्रॅममॅर्ली, एआय प्रेझेंटेशन टूल्स, कंटेंट जनरेशन टूल्स, क्विज-मेकिंग टूल्स आणि लेसन-प्लॅनिंग टूल्सचा अध्यापनात कसा वापर करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एआयच्या मदतीने धडा नियोजन (लेसन प्लॅन), अभ्यास साहित्य, प्रश्नपत्रिका, बहुपर्यायी प्रश्न, पीपीटी तयार करणे आणि विषयाचे सोपे स्पष्टीकरण देणे यावर भर देण्यात आला. माहितीची अचूकता तपासणे, सायबर सुरक्षा, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे, साहित्य चोरी टाळणे आणि शिक्षकांचे व्यावसायिक मूल्य टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम चव्हाण यांनी उपस्थितांना एआयला न घाबरता समजून घेऊन योग्य पद्धतीने वापरण्याचा संदेश दिला. या कार्यशाळेस दादासाहेब रावल फार्मसीचे प्राचार्य डॉ. जी. एम. चव्हाण, विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. गिरासे आणि दादासाहेब रावल सायन्स व आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. कापडणे उपस्थित होते. सरकार साहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, उपाध्यक्ष रविंद्रसिंग जमादार, सचिव सामान्य प्रशासन ललितसिंग गिरासे, सहसचिव आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव आणि यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. वासिल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मनीष सिसोदिया यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: एक हजार शाळा मॉडेल स्कूल करण्याचं उद्दिष्ट- सुनेत्रा पवार

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT