नाशिक

अकरा टक्के लाभांश, विशेष कर्जमर्यादेत वाढ

CD
NSK26H28538 जळगाव : उमवि कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित संचालक मंडळ. --- अकरा टक्के लाभांश, विशेष कर्जमर्यादेत वाढ (उपशीर्षक) उमवि कर्मचारी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीच्‍या सभासदांसाठी विशेष कर्जाची मर्यादा वाढविण्याबरोबर या वर्षी सर्व सभासदांना ११ टक्‍के लाभांश देण्याचा निर्णय पतपेढीच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच विद्यापीठ अधिसभागृहात झाली. अध्यक्ष अरुण सपकाळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील पतपेढीच्या वार्षिक कामाचा अहवाल व वार्षिक आर्थिकपत्रकास मान्यता दिली. २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सभासदहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. सभेस पतपेढीचे उपाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव डॉ. अनिल लोहार, संचालक मंडळातील डॉ. महेंद्र महाजन, राजू सोनवणे, डॉ. सोमनाथ वडनेरे, जयश्री देशमुख, दीपक गावित, विकास बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. सभासदांसाठी विशेष कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांनी वाढवून साडेआठ लाख करण्यात आली. दरमहा भरल्या जाणाऱ्या वर्गणी रकमेत स्वेच्छेने वाढ करता येणार आहे. या वर्षी लाभांश ११ टक्के देण्यात येणार आहे. पतपेढीच्या विविध आर्थिक व प्रशासकीय विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सौरपॅनल बसविण्याबाबत, तसेच पतपेढीच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबतही चर्चा करण्यात आली. चौकट ज्‍येष्ठ सदस्‍यांचा विशेष सन्‍मान कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पतपेढीचे सलग २५ वर्षे सदस्य राहिलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT