नाशिक

गणेशोत्सवापूर्वी मोहाडी-शिरसोली रस्त्याचे खडीकरण

CD
NSK26H28851 जळगाव : मोहाडी-शिरसोली रस्त्याची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने. सोबत नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक नितीन सपके व आदी अधिकारी. ..... गणेशोत्सवापूर्वी मोहाडी-शिरसोली रस्त्याचे खडीकरण बॅरिकेडिंगचेही निर्देश; ३५ लाखांचा प्रस्ताव महासभेत ठेवण्याची आयुक्तांची सूचना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोल पंप ते शिरसोली मार्गाची दुरवस्था लक्षात घेता महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खडीकरण करण्यासह गटारीलगत सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग उभारण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गणेशोत्सवात या मार्गावरून मिरवणुका जातात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाचोरा मार्गावरील वाहतूकही याच रस्त्यावरून वळविली जाते. मात्र, अरुंद आणि खराब झालेल्या रस्त्यालगतची गटार सध्या नाल्यासारखी झाली असून, वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी घडलेल्या अपघातांची माहिती नगरसेविका वैशाली पाटील यांनी आयुक्तांना दिली. तसेच रस्ता विकसित झाल्यास परिसरातील सुमारे एक लाख नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पाहणीवेळी नगरसेवक नितीन सपके, शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचनाकार अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चौकट महासभेत येणार प्रस्ताव या कामासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आयुक्तांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार असल्याने उर्वरित प्रस्ताव आगामी महासभेसमोर ठेवून त्यास मंजुरी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mangalwedha News : दामाजीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Marathi News Live Updates: 'दामाजी'च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT